“आपली आयुष्ये सुंदर बनतात आपण परिपूर्ण आहोत म्हणून नाही. आपली आयुष्ये सुंदर बनतात कारण जे काही आपण करतो त्यात आपलं सर्वस्व अर्पून ते करतो म्हणून."
- सद्गुरू

सद्गुरू

सद्गुरू, एक योगी, द्रष्टा आणि आत्मज्ञानी. भारतातील पहिल्या 50 सर्वात प्रभावी व्यक्तींपैकी एक, सद्गुरु, त्यांच्या परिवर्तनकारी कार्यक्रमांच्या माध्यमातून जगभरातील लाखो लोकांच्या आयुष्याला स्पर्श करत आहे प्राचीन योग विज्ञान आजच्या मानसिक रचनेला अनुरूप असेल अशा स्वरुपात उपलब्ध करून देण्याची सद्गुरुंकडे विलक्षण क्षमता आहे. त्यांचा दृष्टिकोन कोणत्याही वैचारिक प्रणालीशी बांधला गेला नसून स्वपरिवर्तनासाठी एक शक्तिशाली आणि सिद्ध पद्धत देतो.

जागतिक कीर्तीचे वक्ते आणि न्यूयॉर्क टाईम्स बेस्ट सेलर इनर इंजिनिअरिंग: अ योगीज गाईड टू जॉय चे लेखक, सद्गुरू हे युनायटेड नेशन्स सकट अनेक जागतिक व्यासपीठांवर सामाजिक-आर्थिक विकासापासून ते नेतृत्व आणि आध्यात्म यांसारख्या विविध सामाजिक विषयांवर एक प्रभावी मार्गदर्शक आहेत. हार्वर्ड, येल, ऑक्सफर्ड, स्टँफर्ड, वॉरथोर्न आणि MIT यांसारख्या आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये बोलण्यासाठी त्यांना वारंवार आमंत्रित केले जाते.

मानवतेच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी समर्पित असलेले सद्गुरू, यांचा जीवन आणि जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांना भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कायमच आश्चर्यचकित, प्रोत्साहित आणि उद्युक्त करतो.


परिवर्तनाला वचनबद्ध

सद्गुरूंनी 1992 साली ईशा फौंडेशन या ना नफा तत्त्वावरील संस्थेची स्थापना केली ईशा फाउंडेशन जगभरातील 90 लाख स्वयंसेवकांच्या मदतीने 300 केंद्रातून कार्यरत आहे. आंतरिक परिवर्तनाच्या शक्तिशाली योग कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि प्रेरणादायी सामाजिक कार्यांमधून, ईशा फाउंडेशनने मानवी कल्याणाचे सर्व पैलू हाताळण्यासाठी विश्वव्यापी मोहीम निर्माण केली आहे .

सद्गुरुंनी सामाजिक पुनरुज्जीवन, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात विविध प्रकल्पांची सुरुवात केली आहे ज्यांच्या माध्यमातून लाखो लोकांना गरिबी, जीवनाचा खालावलेला दर्जा, यातून बाहेर पडता येऊ शकेल आणि समुदाय आधारित टिकाऊ विकास साधला जाऊ शकेल. 2017 मध्ये सद्गुरुंनी भारताच्या सुकत चाललेल्या आपली जीवनदायिनी नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना अमलात आणण्यासाठी धोरण बदल करण्यासाठी नदी अभियान अर्थात रॅली फॉर रिव्हर्स ह्या देशव्यापी मोहिमेची सुरुवात केली. 16 कोटीहूनही अधिक लोकांचा सहभाग असलेली, विश्वातील ही विशालकाय पर्यावरणीय चळवळ ठरली.

पुरस्कार आणि सन्मान

पद्मविभूषण पुरस्कार

भारत सरकारतर्फे देण्यात आला - हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार बहुमुल्य आणि उल्लेखनीय सेवेसाठी, फेब्रुवारी 2017 मध्ये दिला गेला

न्युयॉर्क टाईम्स बेस्ट सेलर

लिस्ट इनर इंजिनियरिंग - अ योगिज गाईड तो जॉय, सप्टेंबर 2016

खास सल्लागार पद

युनायटेड नेशन्स, इकनॉमिक अँड सोशल काउन्सिल

भारताच्या 50 प्रमुख प्रभावी व्यक्तिंपैकी एक

इंडिया टुडे मासिकातर्फे

इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार

भारताचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार

गिनेस वल्ड रेकॉर्ड

मध्ये प्रोजेक्ट ग्रीन हॅन्ड्सची नोंद केली गेली 800,000 वृक्षांचे रोपण 200,000 स्वयंसेवकांनी केवळ 3 दिवसात केले

इंडिया टुडे सफाईगिरी पुरस्कार

प्रोजेक्ट ग्रीन हॅन्ड्स साठी

सोशल मिडिया

प्रसार माध्यमातील झलक