इनर इंजिनियरिंगच्या व्यक्तिगत उपस्थितीच्या कोर्समध्ये शांभवी महामुद्रा क्रियेची दीक्षा दिली जाते, एक अतिशय प्राचीन क्रिया जीचा जगभर लाखो साधक नियमित सराव करतात. वैज्ञानिक परीक्षणानी ह्या क्रियेच्या नियमित सरावाचे लाभ दाखवून दिले आहेत. मेंदूच्या कार्यशीलतेवर, झोपेचे चक्र, मानसिक आरोग्य आणि शारीरिक स्वास्थ्य अशा विविध पैलूंमध्ये सकारात्मक परिणाम आढळून आले आहेत.
इनर इंजिनीयरिंग ऑनलाईनमुळे सहभाग्यांच्या स्ट्रेसमध्ये (ताणताणाव) 50% हून अधिक घट झाली
कॉर्पोरेट प्रोग्रॅम रिसर्च पार्टनर
इनर इंजिनियरिंग ऑनलाईन केल्याने तुमची उर्जा, आनंद, सतर्कता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ दिसून येते
कॉर्पोरेट प्रोग्रॅम रिसर्च पार्टनर
सतत एक वर्षभर शांभवी महामुद्रा क्रिया सराव करण्याऱ्या साधकांना लक्षणीय मानसिक आणि भावनिक फायदे झाले असल्याचे आढळून आले. दैनंदिन जीवनशैलीत काहीच बदल न करता, शांभवी क्रियेचा सराव केल्याने साधकांमध्ये उत्तम एकाग्रता, अधिक आनंद, उल्ल्हास आणि शांतीची अनुभूती होते.
A study conducted on 536 Shambhavi practitioners showed improvement in the following areas:
शांभवी क्रिया नियमितपणे सराव करणाऱ्या ५३६ लोकांच्या आरोग्य सुधारावर सर्वेक्षण केले गेले, ज्यामध्ये अशा साधकांना दीर्घकालीन आजार जसे की डोकेदुखी, अर्धशिशी, अलर्जी, दमा, पाठ/कंबर दुखी आणि मासिक पाळीच्या विकारांपासून खूप आराम मिळाला. सर्वेक्षणातून असेही आढळून आले आहे की निद्रानाशाची समस्या असलेल्या लोकांमध्ये झोपेची गुणवत्ता वाढली आणि ४०% लोकांमध्ये घेत असलेल्या औषधांचे प्रमाण घट झाली किंवा औषधे कायमची थांबवता आली.
शांभवीचा नियमितपणे सराव करणाऱ्या साधकांमध्ये सुधार आढळून आलेली टक्केवारी
75% स्त्रिया मासिकपाळी संबंधित त्रास अनुभवतात. पूल हॉस्पिटल NHS ट्रस्ट, UK, आणि द इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन यांच्या एका टीमने शांभवी महामुद्रा क्रियेचा नियमित सराव करणाऱ्या 128 स्त्रियांचे प्रश्नावली सर्वेक्षण केले. क्रिया सराव सुरुवात करण्याआधी मासिक पाळीच्या समस्या आणि 6 महिन्याच्या नियमित क्रिया सरावानंतर मासिक पाळीच्या समस्या अशी दोन वेगवेगळी सर्वेक्षणे केली गेली.
Maturi R et al. ईशा योग सराव करणाऱ्या साधकांचे सर्वेक्षण. मार्च 2010
मुरलीकृष्णन K, बालकृष्णन B, बालसुब्रम्हण्यम K, विस्नेगारावला F. मेझरमेंट ऑफ ईशा योगा ऑन कार्डियाक ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टीम युजिंग शोर्ट टर्म हार्ट रेट वेरीयेबीलीटी. J आयुर्वेद इंटिग्र मेड. एप्रिल 2012.
संतोष J, अगरवाल G, भाटिया M, नंदीश्वर SB, आनंद S. स्पॅशियो-टेम्परल EEG स्पेक्ट्रल अनॅलिसिस ऑफ शांभवी महामुद्रा प्रॅक्टिस इन ईशा योगा.
विंचूरकर S, टेलिस S, विश्वेश्वरेय्या NK. दीर्घकालीन ध्यानाच्या सरावाचे झोपेवर होणारे परिणाम: अ म्याचड कंट्रोल ट्रायल. इंटरनॅशनल सिम्पोजियम ऑफ योगीजम डिसेंबर 2010.
निधिराजन TP, माटूरी R, बाळकृष्णन B. ईशा योगाचे मासिक पाळीमुळे होणाऱ्या विकारांवरील परिणाम.
© 2019, Isha Foundation, Inc.
सेवा अटी आणि शर्ती. |
गोपनीयता धोरण. | Powered by Fastly