ईशा आउटरिच
"इतरांची आयुष्ये किती खोलवर तुम्ही स्पर्श करता तितके तुमचे आयुष्य समृद्ध होते.” —सद्गुरू
ईशा आउटरिच, हा ईशा फाउंडेशनचा सामाजिक सशक्तीकरणाचा उपक्रम आहे, जो माणसं आणि समुदायांचे पुनरुज्जीवन आणि सशक्तीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
ग्रामीण जीवन पुनरुज्जीवन
दक्षिण भारतातील 4,600 खेड्यांमधील 70 लाख लोकांना मोफत वैद्यकीय सेवा आणि समुदाय पुनर्वसन केले जाते
ईशा विद्या
एक अग्रणी शैक्षणिक प्रकल्प जो उच्च प्रतीची, परवडणारी शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून ग्रामीण मुलांच्या जीवनाचा कायापालट करतो आहे. आज अशा 9 शाळा स्थापल्या गेल्या आहेत ज्याचा 6,415 विद्यार्थ्यांना लाभ होतो आहे.
प्रोजेक्ट ग्रीनहॅन्ड्स
एक विशालकाय सार्वजनिक वनीकरण मोहीम ज्याद्वारे तामिळनाडू राज्याचे हरित आवरण 10 टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट आहे जेणेकरून राज्याचे वाळवंटीकारण, सुपीक जमिनीची झीज थांबवली जाईल, आणि सोबत स्वावलंबन आणि संवर्धन करून हवामान बदल थांबवला जाऊ शकतो.
नदी अभियान
नदी अभियान (रॅली फॉर रिव्हर्स) सुकत चाललेल्या भारताच्या जीवनदायिनी नद्यांना वाचवण्यासाठीची एक मोहीम आहे. साल 2017 मध्ये सद्गुरुंनी देशातील जलदगतीने सुकत चाललेल्या आपल्या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मोहीम सुरु करून, 16 राज्यांमधून 9300 कि.मी. हूनही अधिक अंतर स्वतः गाडी चालवत प्रवास केला आणि लोकांमध्ये ह्या गंभीर स्थितीबद्दल जागरूकता निर्माण केली.
© 2019, Isha Foundation, Inc.
सेवा अटी आणि शर्ती. |
गोपनीयता धोरण. | Powered by Fastly