इनर इंजिनियरिंग समापन

जगातील ठराविक शहरांमध्ये सद्गुरू स्वतः इनर इंजिनियरिंग समापनाचे कार्यक्रम घेतात. ज्यांनी इनर इंजिनियरिंग ऑनलाईन कोर्स पूर्ण केला आहे त्यांच्यासाठी हा 2 दिवसांचा कार्यक्रम करणे गरजेचे आहे. यात सामील आहे शांभवी महामुद्रा क्रिया, शक्तिशाली आणि शुद्धीकरणाची शांभवी महामुद्रा क्रियेची दीक्षा. एक 21 मिनिटांचे उर्जा आधारित तंत्र ज्यात तुमच्या श्वासाचा उपयोग जातो. त्याचबरोबर उत्साह आणि उर्जावर्धक प्राथमिक योगासने.

ज्यांना सद्गुरुंसोबतच्या ह्या कार्यक्रमात भाग घेणे शक्य नाही, त्यांना ईशा प्रशिक्षित शिक्षकांद्वारे इनर इंजिनियरिंग समापन कार्यक्रम जगातील निवडक शहरात उपलब्ध आहे.

अनिवार्य: इनर इंजिनियरिंग ऑनलाईन

शांभवी महामुद्रा क्रिया

या कार्यक्रमात शांभवी महामुद्रा क्रियेची प्रत्यक्ष दीक्षा दिली जाईल. सद्गुरुंनी देऊ केलेली, एक शक्तिशाली परिवर्तनकारी, 21 मिनिटांची प्राचीन आणि शुद्धीकरणाची योग साधना जी तुमचा सर्वांगीण कायापालट करू शकते. शांभवी महामुद्रा तुमची संपूर्ण शरीर यंत्रणेत अशा प्रकारचा ताळमेळ आणते, जेणेकरून तुमचे शरीर, मन, भावना आणि उर्जा सुसंगतपणे कार्य करू लागतात, ज्यामुळे तुमच्यात निरंतर आनंदाची अनुभूती प्रस्थापित होते. आणि मग तुमचं आयुष्य तुम्हाला हवं तसं तुम्ही घडवू शकता.

आज जगात असे लाखो शांभवीचा सराव करणारे साधक आहेत जे उत्तम भावनिक समतोल, एकाग्रता, स्थैर्य, आणि आरोग्य अनुभवत आहेत.

शांभवी महामुद्रा क्रिया, एक खराखुरा चमत्कार

"शांभवी महामुद्रा हे सृष्टीच्या स्त्रोताला स्पर्श करण्याचं एक साधन आहे. तुमच्यातील गाभ्याला जेव्हा तुम्ही स्पर्श करता, तेव्हा तुमचा कायापालट होतो."
-सद्गुरू

कार्यक्रमाची ठळक वैशिष्ठ्ये

जीवनामध्ये सहजता आणण्यासाठी काही सोपी साधने

आयुष्याचे महत्वाचे पैलू हाताळण्यासाठी ध्यानक्रिया

उत्साह आणि समतोल राखण्यासाठी योग सराव

जागरुकतेसाठी साधने

शांभवी महामुद्रा क्रिया

निरंतर सहाय्य आणि ग्रुप सत्र

पौष्टिक शाकाहारी आहार

फोटो गॅलरी

आगामी कार्यक्रम